फोटोतील 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? लोकप्रिय मालिकेत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:28 IST2025-01-23T18:13:57+5:302025-01-23T18:28:50+5:30

अभिनेत्री गिरीजा प्रभूच्या नव्या फोटोशूटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री गिरीजा प्रभू घराघरात पोहोचली.

या मालिकेच्या माध्यमातून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

या मालिकेत तिने साकारलेल्या गौरी नावाच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.

अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे तिचा चाहत्यांच्या संपर्कात राहते.

गिरीजा प्रभू सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय आहे. त्याद्वारे आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना प्रत्येक अपडेट देते.

नुकतंच अभिनेत्रीने समुद्रकिनारी सुंदर असं फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या हटके पोज देत तिने चाहत्यांचं लक्ष वेधलंय.

"SANDY FEET, HAPPY HEART..." असं कॅप्शन गिरीजाने या फोटोंना दिलं आहे.