"असं रुपडं देखणं...", अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा मनमोहक अंदाज, पाहा PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:03 IST2025-01-03T17:47:11+5:302025-01-03T18:03:15+5:30

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा मनमोहक अंदाज; फोटो शेअर करत म्हणते- "नाही कळले..."

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेमुळे प्राजक्ता घराघरात पोहोचली.

या मालिकेत तिने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती.

प्राजक्ताने उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावरही कायम अ‍ॅक्टिव्ह असते.

सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतेच अभिनेत्रीने निळ्या रंगाची साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे.

प्राजक्ता गायकवाडच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.