'कोण होतीस तू...', मालिकेतील यशच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर, लोकप्रिय मालिकेत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:13 IST2025-08-23T17:02:42+5:302025-08-23T17:13:44+5:30

कावेरी इतकीच सुंदर दिसते यशची बायको? मनोरंजन विश्वाशी आहे खास कनेक्शन

अभिनेता मंदार हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत जयदीपची भूमिका साकारुन तो घराघरात पोहोचला.

या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातल्यानंतर मंदार पुन्हा नव्या भूमिकेतून मालिका रसिकांच्या भेटीला आला आहे. कोण होतीस तू काय झालीस तू या लोकप्रिय मालिकेत तो आता यश धर्माधिकारी ही भूमिका साकारतो आहे.तर गिरीजा प्रभू कावेरी हे पात्र वठवते आहे.

मात्र,फार कमी लोकांना माहित असेल की मंदारच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनर म्हणजेच त्याची पत्नीदेखील एक अभिनेत्री आहे.

मंदारच्या पत्नीचं नाव मितिका शर्मा आहे.'देवों के देव' महादेव या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली.

'देवों के देव' महादेव या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली.

मंदारची पत्नी मितिका खूपच सुंदर दिसते.या जोडप्याला दोन मुलं देखील आहेत.