डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:00 IST2025-06-24T18:44:09+5:302025-06-24T19:00:40+5:30
Shiva Marathi Serial Purva Kaushik Bold Photoshoot: 'शिवा' मालिकेत पूर्वा बेधडक टॉमबॉय लूकमध्ये दिसते...

Shiva Marathi Serial Purva Kaushik Bold Photoshoot:
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'शिवा' (shiva marathi serial) ही सध्या TRP च्या शर्यतीत आघाडीवर आहे. हटके कथेमुळे सुरुवातीपासूनच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
'शिवा' मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षभरात मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. या मालिकेत शिवाची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक-फडके चर्चेत आहे.
'शिवा' मालिकेत पूर्वाची भूमिका बिनधास्त 'टॉमबॉय' स्टाइल आहे. साध्याभोळ्या, शांत आणि सोज्वळ सूनेच्या पारंपरिक भूमिकेला छेद देणारी डॅशिंग मुलगी असा तिचा मालिकेतला रोल आहे.
पडद्यावर 'टॉमबॉय' लूकमध्ये दिसणारी पूर्वा ही खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड, बिनधास्त दिसते. सोशल मीडियावर तिने नुकताच फोटोशूट पोस्ट केलाय. त्यातला तिचा वेगळा लूक चर्चेत आहे.
पूर्वाचा ताजा फोटोशूट खूपच बोल्ड अन् बिनधास्त आहे. या फोटोशूटमध्ये पूर्वा काळ्या रंगाचा लाँग शर्ट घालून बेडवर बसल्याचे दिसतेय. पांढऱ्या बेडशीटवर काळ्या रंगाचा शर्ट ही कलर स्कीम उठून दिसते.
फोटोशूटमधील पूर्वाच्या चेहऱ्यावरील हावभाव खूपच बोलके आहेत. तसेच, तिच्या हेअरस्टाइलकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. 'ए इश्क है' असे कॅप्शन तिने या फोटोशूटला दिले आहे.