PHOTO: "दिसतीया भारी, नेसूनी साडी..." अभिनेत्री शरयू सोनावणेचा मनमोहक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 16:46 IST2024-11-09T16:35:17+5:302024-11-09T16:46:47+5:30
अभिनेत्री शरयू सोनावणे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

शरयूने नुकतेच सोशल मीडियावर तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत.
स्टार प्रवाहवरील 'पिंकीचा विजय असो' या मालिकेमुळे शरयू सोनावणे प्रसिद्धीझोतात आली.
सध्या अभिनेत्री झी मराठीवरील 'पारु' या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसत आहे.
मालिकेत शरयू 'पारू'ची भूमिका उत्कृष्टरित्या साकारते आहे.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे पारंपरिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
फोटोंमध्ये पैठणी साडी, हातात हिरव्या बांगड्या तसेच गळ्यात मंगळसूत्र असा लूक शरयूने केला आहे.
शरयूने शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.