घटस्फोटानंतर ब्रेस्ट कॅन्सरने गाठलं; कर्करोगाशी झुंज देतानाच आला हार्ट अटॅक, मराठी अभिनेत्रीचा झाला दुर्देवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:24 IST2025-08-21T12:56:28+5:302025-08-21T13:24:44+5:30

घटस्फोटानंतर प्रिया यांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. आधीच घटस्फोटामुळे खचलेल्या प्रिया कॅन्सरशी झुंज देत होत्या.

प्रिया तेंडुलकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. कोरीव डोळे आणि सुरेख चेहऱ्याच्या प्रिया यांच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली होती.

सुप्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांची ती मुलगी होती. प्रिया यांनी त्यांच्या अभिनयाने एक काळ गाजवला.

'माहेरची माणसं', 'देवता', 'मुंबईचा फौजदार', 'माळावरचं कुंकू', 'गोंधळात गोंधळ', 'थोरली जाऊ' अशा मराठी सिनेमांमध्ये तुम्ही त्यांना पाहिलंच असेल.

पण, केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमांमध्येही त्या झळकल्या. 'मोहरा', 'बेसहारा', 'मजाल', 'इंसाफ की जंग', 'प्रेम शास्त्र', 'काल चक्र' अशा कितीतरी बॉलिवूड सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं.

कित्येकांच्या काळजाचा ठोका असणाऱ्या प्रिया यांना मात्र आयुष्यात खऱ्या प्रेमासाठी शेवटपर्यंत झुरावं लागलं होतं.

प्रिया यांनी १९८८ साली अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या करण राजदान यांच्याशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर ७ वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.

प्रिया यांना घटस्फोट कधीच घ्यायचा नव्हता. पण, त्यांच्या संशयी स्वभावामुळे करण राजदान यांनी घटस्फोट घेत वेगळं व्हायचं ठरवलं.

घटस्फोटानंतर प्रिया यांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. आधीच घटस्फोटामुळे खचलेल्या प्रिया कॅन्सरशी झुंज देत होत्या.

शेवटपर्यंत त्या प्रेमाची वाट पाहत राहिल्या. पण, त्यांना ते मिळालं नाही.

शेवटी २००२ साली हृदयविकाराच्या झटक्याने प्रिया यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्या केवळ ४७ वर्षांच्या होत्या.