प्राजक्ता माळीला करायचं आहे लग्न, म्हणाली- "लग्न म्हणजे डोकेदुखी वाटायची, पण आता..."
By कोमल खांबे | Updated: February 20, 2025 16:35 IST2025-02-20T16:30:44+5:302025-02-20T16:35:01+5:30
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
प्राजक्ताने नुकतीच जयंती वाघधरेच्या 'आम्ही असं ऐकलंय' या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये प्राजक्ताने लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली.
प्राजक्ता म्हणाली, "मी आता आईला माझ्यासाठी मुलगा शोधण्याची परनावगी दिलीये".
याबरोबरच तिने एका शेतकरी मुलाने पत्र लिहून लग्नाची मागणी घातल्याचा किस्सा सांगितला.
"आईला खरंच दोन पत्र आली आहेत. आणि मला ती इतकी आवडली आहेत की मला असं वाटतंय की खरंच त्यांना फोन लावावा", असं ती म्हणाली.
पुढे तिने सांगितलं, "त्यातील एका पत्रामध्ये त्यांनी खूप प्रांजळपणे म्हटलंय की मी शेतकरी आहे. मला माहितीये की मी खूप वेगळ्या लेव्हलचं बोलतोय. तुमचं प्रोफेशन वेगळं आहे".
"पण, मला हे सांगायचं आहे की मी शेतकरी आहे आणि मी शेतीच करणार. तुम्हाला हे आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचं आहे".
"मला हे इतकं आवडलं की मी म्हटलं हे किती गोड आहे. आधी मी या सगळ्या गोष्टींसाठी तयार नव्हते".
"ही डोकेदुखी नको असं मला वाटायचं. पण, आता मी आईला म्हटलंय आता तू माझ्यासाठी मुलगा शोधूनच आण".
"मला बघायचंच आहे आता कोण आहे तो मुलगा...मी तयार आहे".