पूजाच्या साखरपुड्याचा रॉयल कारभार; पाहा अभिनेत्रीच्या एंगेजमेंटचा अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 15:43 IST2024-02-18T15:37:03+5:302024-02-18T15:43:51+5:30

Pooja sawant: पूजाने इन्स्टाग्रामवर तिच्या साखरपुड्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत हिचा नुकताच साखरपुडा झाला.

पूजाने सिद्धेश चव्हाण याच्यासोबत साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

सध्या सोशल मीडियावर पूजाच्या साखरपुड्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

साखरपुडा झाल्यानंतर पूजाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

साखरपुडा झाल्यानंतर पूजा आणि सिद्धेशने केक कट केला. त्यांच्या एंगेजमेंटचा केकही खास होता. हा केक खास डिझाइन करण्यात आला होता.

साखरपुड्याला पूजाच्या मित्रमैत्रिणींनी प्रचंड मज्जा केल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं.

पूजाने साखरपुड्यासाठी हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर सिद्धेशने तिला मॅच होणारा कुर्ता पायजमा परिधान केला होता.