होणाऱ्या सासूबाईंची नेसली साडी, शेअर केले फोटो; ऐश्वर्या नारकरांची सून होणार 'ही' अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:23 IST2025-06-17T13:16:27+5:302025-06-17T13:23:40+5:30
ओळखलंत का या अभिनेत्रीला?

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपल अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर आजही दिसायला सुंदर आणि अगदी फिट आहेत.
अमेय नारकर हा त्यांचा मुलगा आहे. नुकताच तो भारतात परत आला आहे. अमेय विमानतळावर येताच त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री ईशा संजयने त्याला सरप्राईज दिलं.
ईशा संजय आणि अमेय काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या फोटोंची कायम चर्चा असते.
नुकतेच ईशाने साडीतील फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे ही साडी तिला होणाऱ्या सासू ऐश्वर्या नारकर यांनीच दिली आहे. तिने कॅप्शनमध्ये तसं लिहिलं आहे.
ईशा दिसायला अतिशय सुंदर आहे. ऐश्वर्या नारकरांनी दिलेल्या या खणाच्या साडीत तिचं सौंदर्य खुलून आलं आहे. त्यातच तिची गोड स्माईल लक्ष वेधून घेत आहे.
ईशा उत्तम डान्सरही आहे. ती सध्या 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत राजश्रीची भूमिका साकारत आहे. मालिकेत तिला सगळे राजू असंही म्हणतात.
ईशाचा ऐश्वर्या नारकरांसोबत छान बाँड आहे. हे अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन पाहायला मिळालं आहे.