Photos: उत्तराखंडच्या निसर्गरम्य वातावरणात विशाल निकम-अक्षयाचं सुंदर Post wedding फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:05 IST2026-02-13T13:52:46+5:302026-02-13T15:05:32+5:30

विशाल-अक्षयाचे मनमोहक Photos

अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल नुकतंच लग्नबंधनात अडकलं.

ना मुंबई, ना पुणे तर उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजे विशालच्या वाढदिवशी १० फेब्रुवारी रोजीच त्यांनी या मंदिरात सप्तपदी घेतली. या मंदिरात महादेव आणि पार्वती यांनी लग्न कलं होतं.

लग्नानंतर दोघांनी उत्तराखडंच्या नैसर्गिक मनमोहक वातावरणात छान फोटोशूटही केलं. हे फोटो आात समोर आले आहेत.

विशालने हिरव्या रंगाचं धोतर नेसलं आहे. तर गळ्यात उपरणं घेतलं आहे.

तर अक्षयाने हिरव्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज, केशरी रंगाची लेहेंगा स्टाईल साडी, हातात हिरव्या बांगड्या, सोन्याच्या पाटल्या असा लूक केला आहे.

विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉस मराठीच्या घरात विशालने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्याच्या आयुष्यात सुंदरा आहे असं त्याने म्हटलं होतं.

काही महिन्यांपूर्वीच त्याने ही सुंदरा अक्षया हिंदळकर आहे असा खुलासा केला. काही दिवसांपासून त्यांची प्री वेडिंग शूटचा सोशल मीडियावर धुमाकूळ होता. फोटो सौजन्य - vishal nikam instagram