फोटोतील छोट्या मुलाला ओळखलं का? आज आहे मराठी सिनेसृष्टीतील अभिनयाचा बादशहा

By देवेंद्र जाधव | Updated: December 13, 2025 18:22 IST2025-12-13T18:11:22+5:302025-12-13T18:22:37+5:30

फोटोतील हा बालकलाकार आज मराठी नव्हे तर भारतीय सिनेसृष्टी गाजवत आहे. तुम्ही ओळखलं नसेल तर बातमीवर क्लिक करुन जरुर वाचा

फोटोतील या छोट्या मुलाला ओळखलं का? हा मुलगा आज मराठीच नव्हे तर भारतीय सिनेसृष्टीतील अभिनयाचा सम्राट म्हणून ओळखला जातो

हा बालकलाकार दुसरा तिसरा कोणी नसून ते आहेत अशोक सराफ. अशोक यांनी सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीची ही खास आठवण शेअर केली आहे

या फोटोत अशोक सराफ एका नाटकात काम करत आहेत. १९७५ साली अशोक सराफ यांनी संशयकल्लोळ या नाटकात अभिनय केला होता.

अशोक सराफ यांचे मामा गोपीनाथ सावकार यांनीच हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. या नाटकात अशोक सराफ यांनी छोटीशी भूमिका साकारली होती

अशाप्रकारे अशोक सराफ यांचा बालपणीचा फोटो समोर येताच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अशोक सराफ बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात किती सक्रीय होते, हेच यावरुन पाहायला मिळतंय.

अशोक सराफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ते सध्या अशोक मा.मा. या मालिकेत काम करत आहेत. ही मालिका कलर्स मराठीवर सुरु आहे.

मालिकेशिवाय अशोक सराफ लवकरच साडे माडे तीन २ सिनेमात दिसणार आहेत. सर्वांना अशोकमामांच्या या सिनेमाची उत्सुकता आहे.