LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 13:07 IST2017-02-01T06:10:20+5:302017-02-01T13:07:06+5:30
कॉटन किंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्डचं आयोजन लोकमतच्या वतीने मुंबईत करण्यात आलं होतं. प्रोगेस पार्टनर बीव्हीजी लिमिटेड आहेत तर या सोहळ्यासाठी RED FM रेडिओ पार्टनर, कलर्स मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा न्यूज पार्टनर असलेल्या या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, फॅशन तसंच उद्योगजगतामधील स्टायलिश मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.नेहमीच हृतिक रोशनची तरुणार्इंमध्ये स्टाइल फॉलो केली जाते.त्याच्या याच लोकप्रियतेमुळे या पुरस्कार सोहळ्यात हृतिकला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश सुपरस्टार हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकमत’ समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते हृतिकचा यावेळी गौरव करण्यात आला.