काव्या इतकीच सुंदर दिसते 'लग्नानंतर होईलच प्रेम'मधली पार्थची खरी बायको, विजयची पत्नीही आहे अभिनेत्री, तुम्ही पाहिलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:07 IST2025-08-19T16:04:03+5:302025-08-19T16:07:50+5:30
'लग्नानंतर होईलच प्रेम' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेतील पार्थ-काव्याची जोडी प्रेक्षकांना आवडते. पण, तुम्ही पार्थच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का?

'लग्नानंतर होईलच प्रेम' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेतील पार्थ-काव्याची जोडी प्रेक्षकांना आवडते.
पण, तुम्ही पार्थच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का?
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत अभिनेता विजय आंदळकर पार्थची भूमिका साकारत आहे.
विजयच्या पत्नीचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याने खास पोस्ट शेअर केली आहे.
विजयच्या पत्नीचं नाव रुपाली असं आहे. रुपालीदेखील एक अभिनेत्री आहे.
तिने 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायको' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.
तर आम्ही बेफिकर या सिनेमातही ती दिसली होती. विजय अनेकदा पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो.