शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

क्रांती रेडकरने नणंद यास्मीन वानखेडे यांच्यासोबत अशी साजरी केली दिवाळी; पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 2:03 AM

1 / 10
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर, राज्यात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) विरुद्ध महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik), असे चित्र निर्माण झाले आहे. नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करताना दिसत आहेत. तसेच वानखेडे कुटुंबाकडूनही मलिकांना प्रत्युत्तर दिले जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सध्या अभिनेत्री क्रांती रेडकर चर्चेत आहे.
2 / 10
सध्या संपूर्ण देशात दिवाळी सण उत्साहात साजरा होत आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरही सर्व टेन्शन बाजूला सारून उत्साहात दिवाळी साजरी करत आहेत.
3 / 10
क्रांती रेडकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणि ट्विटरवरही काही फोटो पोस्ट करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
4 / 10
क्रांतीने घरात आणि घराच्या ओपन स्पेसमध्ये दिवे लावतानाचे फोटो आणि व्हिडिओदेखील इन्स्टाग्रामवर टाकले आहेत.
5 / 10
इन्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये क्रांती नणंद यास्मीन वानखेडे यांच्यासोबत दिवे लावताना दिसत आहेत.
6 / 10
क्रांती आणि यास्मीन यांनी घराच्या ओपन स्पेसमध्ये दिवे अथवा पणत्या ठेवताना त्याभोवती सुंदर साजवटही केलेली दिसत आहे.
7 / 10
क्रांतीने घराच्या ओपन स्पेसमध्ये ठेवलेल्या पणत्यांभोवती स्टिकरची रांगोळी लावली आहे.
8 / 10
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमधून आणि व्हिडिओमधू क्रांतीच्या चेहऱ्यावरील दिवाळीचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.
9 / 10
क्रांतीने तिचे घर आणि घराचा ओपन स्पेस दिव्यांनी आणि रांगोळ्यांनी सजवला आहे.
10 / 10
क्रांती रेडकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.(All Photo : Kranti Redkar Instagram and twitter)
टॅग्स :Kranti Redkarक्रांती रेडकरSameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिकcinemaसिनेमा