मुस्लिम अभिनेत्रीने ८ वर्ष छोट्या हिंदू अभिनेत्याशी केलं लग्न, मालिकेत साकारली त्याच्या आईची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:18 IST2025-04-16T14:12:45+5:302025-04-16T14:18:29+5:30
अभिनेत्रीला आता ४ वर्षांचा गोंडस मुलगा आहे.

टेलिव्हिजनवर अनेक मालिका गाजतात. मालिकांमधील मुख्य कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि खऱ्या आयुष्यात लग्नही करतात.
अशीच एक टेलिव्हिजनवरची जोडी आहे जे खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री चक्क त्याची आई होती. कोण आहे हे कपल?
टीव्हीवर आई-मुलगा आणि खऱ्या आयुष्यात नवरा बायको असलेली ही जोडी आहे सुयश राय (Suyash Rai) आणि किश्वर मर्चंट (Kishwar Merchant).
किश्वर मर्चंट मुस्लिम असून सुयश राय हिंदू पंजाबी कुटुंबातला आहे. २०१६ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. किश्वर सुयशपेक्षा ८ वर्षांनी मोठी आहे. वयातील अंतरामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.
'प्यार की ये एक कहानी' या गाजलेल्या मालिकेत किश्वरने सुयशच्या आईची भूमिका साकारली होती. याचदरम्यान दोघं प्रेमात पडले आणि काही वर्षांनी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
सुयशची आई या निर्णयाच्या विरोधात होती. कारण त्यांच्या वयात जास्त अंतर होतं. मात्र अखेर लेकाच्या प्रेमापोटी तिने होकार दिला.
किश्वरने २०२१ साली एका गोंडस मुलाला जन्म दिला. वयाच्या ४० व्या वर्षी ती आई झाली. दोघंही लेकाला प्रत्येक धर्माची शिकवण देतात.
त्यांच्या मुलाच्या एका व्हिडिओमध्ये त्याच्या डोक्यावर मुस्लिम टोपी आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ होती. ते पाहून लोकांनी दोघांना चांगलंच ट्रोल केलं होतं. यावर किश्वरने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं होतं.