स्वप्नांची राखरांगोळी, ‘उद्धवस्त’ऑफिसामध्ये पोहोचली कंगना, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 19:18 IST2020-09-10T18:41:09+5:302020-09-10T19:18:04+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आज पाली हिल स्थित आपल्या ऑफिसमध्ये पोहोचली होती. कंगनासोबत तिची बहीण आणि मॅनेजर सुद्धा होती. बुधवारी बीएमसीने कंगनाच्या ऑफिसवर बुल्डोजर चालवला होता आणि तिच्या 48 कोटी किंमत असलेल्या ऑफिसमध्ये तोडफोड केली होती.
कंगनाने तिथे 10 मिनिटं थाबून बीएमसीने नक्की किती नुकसान केलंय याचा आढावा घेतला.
महाराष्ट्र सरकारने उचललेल्या पावलावरून कंगना नाराज असून ते ऑफिस तिच्यासाठी स्वप्नांचे ऑफिस होते
कंगनाच्या ऑफिसचे जेवढे नुकसान झाले आहे त्याची एकूण रक्कम 2 कोटींच्या घरात जाते.
कंगनाने उच्च न्यायालयात बीएमसीने बेकायदा कारवाई केल्याचे अॅफिडेव्हीट दिले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई करणार असे तिचे म्हणणे आहे.
कंगनाने जानेवारी महिन्यात आपल्या नव्या ऑफिसचे उद्घाटन आणि पूजा केली होती.
ऑफिस बघितल्यावर कंगनाच्या चेहऱ्यावरचे उदासी स्पष्ट दिसत होती.
कंगनाचे ऑफिस तोडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही राजकीय वातावरण तापलेले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत
कंगनाने बुधवारी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं होत.