'कभी खुशी कभी गम' मधील काजोल-शाहरूखचा मुलगा आहे तरी कुठे आणि आता काय करतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 16:40 IST2021-12-16T16:35:16+5:302021-12-16T16:40:19+5:30
Jibran Khan : 'कभी खुशी कभी गम' सिनेमात काजोल आणि शाहरूख खानच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या जिबरानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, जिबरान काय करतो आणि तो आता किती मोठा झाला आहे?

करण जोहर ( Karan Johar)ने दिग्दर्शित केलेल्या 'कभी खुशी कभी गम' (Kabhi Khushi Kabhie Gham) ला नुकतेच ० वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने सिनेमातील स्टार्स करिना कपूर, काजोलसहीत अनेक सेलिब्रिटींनी या सिनेमातील सीन आणि डायलॉग रिक्रएट केले. या सिनेमात शाहरूख खान आणि काजोलचा मुलगा कृष ची भूमिका साकारणाऱ्या जिबरान खान याने एक डायलॉग रिक्रिएट केला. पण हा चिमुकला आता कुठे आहे? काय करतो? हे अनेकांना माहीत नाही. चला जाणून घेऊ त्याच्याबाबत.....
अमिताभ बच्चन, शाहरूख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर आणि जया बच्चन स्टारर कभी खुशी कभी गमने नुकतीच २० वर्षे पूर्ण केलीत. करण जोहर सिनेमाच्या कास्टसंबंधी व्हिडीओ आणि फोटोज शेअर करत आहे. अशात सिनेमात काजोल आणि शाहरूख खानच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या जिबरानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, जिबरान काय करतो आणि तो आता किती मोठा झाला आहे? (फोटो साभारः Instagram @jibraan.khan)
जिबरान खानने या सिनेमात शाहरूख खान आणि काजोलचा मुलगा कृषची भूमिका साकारली होती. त्याच्या क्यूट चेहऱ्याववर सगळे फिदा झाले होते. त्याच्या या सिनेमातील कामाचं कौतुक झालं होतं.
'कभी खुशी कभी गम' मध्ये काम केलं तेव्हा जिबरान खान हा केवळ ९ वर्षांचा होता. आज तो २८ वर्षांचा झाला आहे. या महिन्यातच चार तारखेला त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला होता.
जिबराननेही 'कभी खुशी कभी गम'ला २० वर्ष पूर्ण झाल्यावर आनंद व्यक्त केला होता आणि एक सीन रिक्रिएट केला. यात तो सिनेमातील लोकप्रिय डायलॉग बोलताना दिसत आहे.
जिबरानने रिक्रिएट व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, '"अगर जिंदगी में कुछ हासिल करना हो, कुछ पाना हो...तो हमेशा 'कभी खुशी कभी गम' देखें, यह फिल्म वह जगह है जहां मुझे कैमरे से प्यार हो गया."
जिबरान या सिनेमानंतर 'रिश्ते', 'क्यो की... मैं झूठ नहीं बोलता' सारखा आणखीही काही सिनेमात काम केलं होतं. त्याने अनेक सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं.
जिबरान हा 'महाभारत' मालिकेत अर्जुनाची भूमिका साकारणारा अभिनेता फिरोज खानचा मुलगा आहे. त्याच्या आईचं नाव कश्मीरा खान आहे. तर त्याला दोन फराह आणि सनाह बहिणी आहेत.
जिबरान खान एक प्रोफेशनल डान्सर आहे आणि सध्या त्याच्या वडिलांच्या डान्स अकॅडमीमध्ये डान्स इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत आहे. इतकंच नाही तर तो ब्रम्हास्त्र सिनेमाचा असिस्टंट डिरेक्टरही आहे.