'कभी खुशी कभी गम'मधली छोटी 'पू' लग्नाच्या २ वर्षांनंतर होणार आई, ओटभरणीचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:55 IST2025-06-17T16:52:03+5:302025-06-17T16:55:16+5:30

Malvika Raj : करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात छोटी पूची भूमिका साकारणारी अभिनेत्री मालविका राजने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात छोटी पूची भूमिका साकारणारी अभिनेत्री मालविका राजने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

मालविका राज प्रेग्नेंट आहे. लग्नाच्या २ वर्षांनंतर तिच्या घरी पाळणा हलणार आहे.

नुकतेच मालविका राजच्या ओटभरणीचे फोटो समोर आले आहेत. या फोटोत तिचा प्रणव बग्गासोबतचेही फोटो शेअर केले आहेत.

यावेळी मालविकाने हिरव्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट असलेला लेहंगा परिधान केला आहे. मालविकाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये, मालविकाने तिचा प्रियकर प्रणव बग्गासोबत इन्स्टाग्रामवर तिच्या साखरपुड्याची घोषणा केली होती.

प्रणव एक व्यावसायिक आहे. त्याने तुर्कीतील कॅपाडोसिया येथे हॉट एयर बलूनमधून लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.

तो आणि मालविका कॉमन फ्रेंड्सद्वारे भेटले आणि १० वर्षांहून अधिक काळ डेट केले. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये गोव्यात लग्न केले.