खोट्या व्हिसावर भारतात राहिली, बॉलिवूड अभिनेत्यासोबत संसार थाटला; इराणी अभिनेत्रीचा असा झाला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:38 IST2026-03-02T13:29:45+5:302026-03-02T13:38:41+5:30

अमेरिका-इराण-इस्रायल या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटल्याचं दिसत आहे. भारतातही याचे परिणाम जाणवत आहेत. या दरम्यानच एका अभिनेत्रीची चर्चा होत आहे जी मुळची इराणची होती.

अमेरिका-इराण-इस्रायल या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटल्याचं दिसत आहे. भारतातही याचे परिणाम जाणवत आहेत. या दरम्यानच एका अभिनेत्रीची चर्चा होत आहे जी मुळची इराणची होती.

इराणी-नॉर्वेजियन असलेल्या नेगर खान हिने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं होतं.

शादी का लड्डू, अब बास, डबल क्रॉस, दो चेहरे, रुद्राक्ष या सिनेमांमध्ये ती दिसली होती. चढती जवानी मेरी चाल मस्तानी या गाण्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.

नेगर खान हिने बॉलिवूड अभिनेता असलेल्या साहिल खानसोबत २००४ मध्ये संसार थाटला होता. मात्र अवघ्या एकाच वर्षांत त्यांचा संसार मोडला.

२००५ मध्ये नेगर खान वादात अडकली होती. बनावट कागदपत्र आणि व्हिसामुळे ती अडचणीत आली होती.

नेगर खान भारतात टुरिस्ट व्हिसावर काम करत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तिची भारतातून हकालपट्टी करत नॉर्वेला पाठवण्यात आलं.

तेव्हा तिचं साहिलसोबत लग्न झालं होतं. त्यामुळेच ती भारतीय असल्याचा युक्तिवादही करण्यात आला होता. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.

भारत सोडल्यामुळे साहिलसोबत तिचा घटस्फोट झाला. त्यानंतरही नॉर्वेमध्ये नेगरने काम सुरू ठेवलं होतं.

आता मात्र तिच्यात खूपच बदल झाला असून तिचा चेहरा बदलला आहे. आता नेगरला ओळखणंही कठीण झालं आहे.