PHOTOS : ‘इंडियन आयडल 12’फेम सायली कांबळेच्या हातावर सजली मेहंदी, लग्नविधींना सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 17:03 IST2022-04-22T16:56:28+5:302022-04-22T17:03:19+5:30

Sayli Kamble Wedding, Mehndi Ceremony : सायली परवा म्हणजे येत्या 24 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहे. सायलीच्या लग्नविधींना सुरूवात झाली असून सायलीच्या हातावर धवलच्या नावाची मेहंदी सजली आहे.

‘इंडियन आयडल 12’ हा सिंगींग रिअ‍ॅलिटी शो कधीच संपला. पण या सीझनच्या स्पर्धकांची चर्चा अधूनमधून होत राहते. तूर्तास चर्चा आहे ती ‘इंडियन आयडल 12’ची सेकंड रनरअप सायली कांबळे हिची. होय, सायली परवा म्हणजे येत्या 24 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहे.

सायलीच्या लग्नविधींना सुरूवात झाली असून सायलीच्या हातावर धवलच्या नावाची मेहंदी सजली आहे.सायलीने इन्स्टास्टोरीवर मेहंदी सेरेमनीची झलक शेअर केली आहे. एका फोटोत मेहंदीच्या कोननी सजलेलं ताट दिसतेय.

इन्स्टावर एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. यात ती मेहंदी सोहळ्यात मैत्रिणींसोबत धम्माल करताना दिसून येत आहे.

सायली व धवलच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटोही व्हायरल होत आहेत. दोघांनीही रोमॅन्टिक पोझ दिल्या आहेत.

‘इंडियन आयडल 12’मध्ये असताना सायलीच्या लव्ह लाईफची चर्चा अशीच रंगली होती. शोचा कंटेस्टंट निहाल तारोसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. पण हा केवळ शोचा टीआरपी वाढवण्यासाठीचा फंडा होता.

शो संपल्यानंतर स्वत: सायलीने तिच्या लव्हलाईफचा खुलासा केला होता. प्रियकरासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर करत तिने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. इतकंच नाही तर प्रियकराच्या नावाचाही खुलासा केला होता.

यानंतर काही दिवसांनी सायलीने बॉयफ्रेन्ड धवलसोबत साखरपुडा उरकला होता. आता लवकरच सायली व धवल लग्नबंधनात अडकणार आहेत.

नुकतीच सायली विदेश दौ-यावरून परतली आहे. सध्या ती सोनी वाहिनीवरील एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये मेंटॉरच्या भूमिकेत दिसत आहे.

‘इंडियन आयडल 12’ संपल्यानंतर सायलीने ‘कोल्हापूर डायरी’ या सिनेमासाठी आपला आवाज दिला. अवधुत गुप्तेने या चित्रपटाला संगीत दिलं आहे.