पतीच्या पाठिंबा ठरला मोलाचा! एका मालिकेने रातोरात बदललं नशीब, टीव्हीवरची 'जोधाबाई' आता काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:45 IST2025-11-19T16:22:24+5:302025-11-19T16:45:44+5:30

एका मालिकेने रातोरात बदललं नशीब, टीव्हीवरची 'जोधाबाई' आता काय करते?

टीव्हीवरील 'जोधा अकबर' ही मालिका सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या मालिकांपैकी एक होती.

या मालिकेत अभिनेता रजत टोकसने अकबरची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री परिधी शर्माने राणी जोधाबाईंच्या भूमिकेत दिसली.

साल २०१३ ते २०१५ दरम्यान झी टीव्हीवर ही मालिका प्रसारित व्हायची. या मालिकेमुळे परिधी घराघरात जोधा म्हणून प्रसिद्ध झाली.

या मालिकेतील तिच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक झालं. त्यांनंतर परिधी पटियाला बेब्स मालिकेत दिसली.

मात्र, मागील काही काळापासून ही अभिनेत्री इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नव्हती. त्यामुळे तिच्याबद्दल जाणूस घेण्याच चाहते प्रचंड उत्सुक होते.

परिधी शर्माने तिचा पती तन्मय सक्सेनाच्या पाठिंब्यामुळे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. लग्नानंतर अभिनयाच्या जगात प्रवेश केला.

पण, तिला खरी ओळख २०१३ मध्ये आलेल्या 'जोधा अकबर' मालिकेतून खरी ओळख मिळाली.

आता बऱ्याच कालावधीनंतर परिधीने दमदार कमबॅक करत थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे.

परिधी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हक सिनेमात झळकली. या चित्रपटात इमरान हाश्मी आणि यामी गौतमसोबत तिने स्क्रिन शेअर केली.