'कोणी तरी येणार येणार गं....' पारंपरिक अंदाजात पार पडला मराठमोळ्या अभिनेत्रीचा डोहाळ जेवणाचा सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 07:00 IST2021-08-03T07:00:00+5:302021-08-03T07:00:00+5:30
कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत असतील. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे उर्मिला निंबाळकर.

उर्मिला निंबाळकर माहेराला जाण्याआधी परंपरेनुसार तिच्या डोहाळे जेवणाचा खास कार्यक्रम पार पडला.
या फोटोत तिने हिरव्या आणि गुलाबी रंगाचे कॉम्बिनेशन असलेली साडी, नकात नथ, कपाळावर हळद कुंकू आणि डोक्याला फुलांचा गजरा असा साजश्रृंगार तिने कला आहे.
ढेपे वाडामध्ये मराठमोळ्या पद्धतीने उर्मिलाने डोहाळ जेवणाचा कार्यक्रम केला आहे.
उर्मिलाने तिच्या या खास क्षणाचे फोटो व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केले आहे.
उर्मिलाही कोडकौतुकात हरखून गेली होती.
उर्मिला आतुरतेने बाळाच्या आगमनाची वाट पाहात आहे.
गरोदर असल्याचे चाहत्यांना सांगितल्यापासून प्रत्येक गोष्ट तिने चाहत्यांसह शेअर करताना दिसली.
प्रेग्नंसीमध्येही उर्मिलाने विश्रांती न घेता तिचे काम एन्जॉय करतान दिसली.
तिने प्रेग्नंसीचा प्रत्येक टप्पा तितक्याच मोठ्या आनंदाने एन्जॉय केला.
यावेळी उर्मिला मराठमोळ्या साजश्रृंगारात खूप सुंदर दिसत होती.
उर्मिलाने तिच्या आयुष्यातील हा खास क्षण खऱ्या अर्थाने संस्मरणीय केला आहे.