'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं कोकणातलं कौलारु घर पाहिलंत का?, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 08:57 IST2023-06-24T08:54:35+5:302023-06-24T08:57:49+5:30
Nikhil Bane : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील निखिल बनेचे गावाकडचे घर खूपच छान आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून निखिल बने घराघरांत पोहोचला.
निखिल बने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतो. सध्या त्याचे कोकणातल्या कौलारु घरामुळे तो चर्चेत आला आहे.
निखिल बने हा मुंबईत राहत असला तरी त्याचे गाव चिपळूण आहे.
त्याच्या गावाकडचे घर खूपच छान आहे. कौलारु घर, हिरवी झाडी आणि सारावलेलं अंगण असं ठुमदार घर आहे.
निखिल नुकताच कुटुंबियांसोबत कोकणात गेला असून तिथले फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
निखिलच्या घरातील फोटोंच्या माध्यमातून कोकणाची सुंदरता पाहायला मिळत आहे.
निखिल बनेच्या कोकणातील घराला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
निखिल बनेला कमी कालावधीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली.
निखिल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.