SEE PICS : म्हणून रिमी सेनने सोडली इंडस्ट्री; अभिनय सोडून आता करतेय हे काम
By रूपाली मुधोळकर | Updated: September 21, 2020 15:17 IST2020-09-21T15:06:02+5:302020-09-21T15:17:59+5:30
अभिनेत्री रिमी सेन हिचा आज वाढदिवस

हंगामा, बागबान, दीवाने हुए पागल, गोलमाल अलिमिटेड असे असे अनेक चित्रपट करणारी अभिनेत्री रिमी सेन हिचा आज वाढदिवस.
21 सप्टेंबर 1981 रोजी पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे रिमीचा जन्म झाला.
रिमीने अॅक्टिंगच्या दुनियेला कधीच रामराम ठोकलाय. 39 वर्षांची रिमी अद्यापही अविवाहित आहे.
रिमीने बालपणापासून अॅक्टिंगला सुरुवात केली. पुढे ती मॉडेलिंगच्या विश्वास आली. मॉडेलिंगच्या ग्लॅमरस जगात रिमी एक मोठे नाव बनले.
हंगामा या सिनेमातून तिचा बॉलिवूड डेब्यू झाला. तिचा हा पहिला कॉमेडी सिनेमा हिट झाला. मग काय, तिला एक ना अनेक सिनेमे मिळत गेलेत.
हिंदीसोबतच बंगाली आणि तेलगू सिनेमेही तिने केलेत.
धूम, गरम मसालानंतर तिला सलमान खानसोबत ‘क्योंकी’ या सिनेमात संधी मिळाली. यानंतर दीवाने हुऐ पागल, फिर हेराफेरी, गोलमाल अशा सिनेमातही तिची वर्णी लागली.
2015 मध्ये रिमी सेन बिग बॉसच्या 9व्या सीझनमध्ये दिसली होती. पण या घरात ना रिमीने कुठला टास्क केला , ना अॅक्टिव्ह राहिली.
यानंतर तिने राजकारणातही हात आजमावला. भाजपात ती सामील झाली. पण तिथेही ती फार रमली नाही. आता रिमीने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात काम करतेय.
तेच ते कॉमेडी सिनेमे करून रिमी कंटाळली होती. म्हणून तिने अभिनयाला रामराम ठोकला. आता मी अभिनय करणार नाही. खरं तर मला चित्रपट मिळत होते, म्हणून मी काम करत गेले. पण एक वेळ अशी आली, जेव्हा मी फारसं एन्जॉयही करत नव्हते. विनोदी चित्रपट करुन-करुन मी थकले. अखेर मी अभिनय सोडून दिला, असे रिमीने एका मुलाखतीत सांगितले होते.