गजरा, बिंदी अन्...; जिनिलीयाचा असा लूक, फोटो पाहून आठवेल 'हम आपके है कौन'मधली माधुरी दीक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:28 IST2025-06-09T13:24:03+5:302025-06-09T13:28:24+5:30

जिनिलीयाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने खास लूक केल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलीया देशमुखचा चाहता वर्ग मोठा आहे. जिनिलीया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.

नुकतंच जिनिलीयाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने खास लूक केल्याचं दिसत आहे.

जिनिलीयाने निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. यावर तिने डिझायनर ओढणी घेतली आहे.

कानात मोठे खड्यांचे कानातले, खड्यांची ज्वेलरी घालत तिने केसांत गजरा माळला आहे. यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

या फोटोंना जिनिलीयाने "गजरा, बिंदी, हाथफूल, अनारकली और मै मेरी फेव्हरेट हूँ", असं कॅप्शन दिलं आहे.

जिनिलीयाच्या या फोटोंवरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीये. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

जिनिलीयाचा हा लूक पाहून 'हम आपके है कौन'मधल्या माधुरी दीक्षितची आठवण चाहत्यांना आली आहे.

दरम्यान, जिनिलीया 'सितारे जमीन पर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती आमिरसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.