'गँग्स ऑफ वासेपूर'मधील 'दुर्गा' सध्या काय करते? लग्नानंतर इंडस्ट्रीतून झाली अचानक गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:47 IST2026-02-17T16:32:31+5:302026-02-17T16:47:06+5:30

अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील 'दुर्गा' ही आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.

अभिनेत्री रीमा सेन एकेकाळी दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव होती. मात्र, २०१२ मध्ये कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच ती अचानक सिनेसृष्टीतून गायब झाली.

गेल्या १४ वर्षांपासून रीमा काय करतेय आणि ती चित्रपटांपासून दूर का गेली, याचा खुलासा आता झाला आहे.

रीमा सेनच्या लोकप्रियतेची सुरुवात तमिळ चित्रपट 'मिन्नाले'मधील 'वसिगरा' या गाण्याने झाली. आर. माधवनसोबतची तिची केमिस्ट्री आणि तिचं निरागस सौंदर्य पाहून ती रातोरात तरुणांच्या हृदयाची धडकन बनली.

आजही २५ वर्षांनंतर हे गाणे तितकेच लोकप्रिय आहे. तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत तिने सिलंबरसन, विशाल यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम करून स्वतःची ओळख निर्माण केली होती.

दाक्षिणात्य चित्रपटात आपला ठसा उमटवल्यानंतर रीमाने बॉलिवूडमध्येही नशीब आजमावले. अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील तिची 'दुर्गा' ही भुमिका विशेष गाजली.

मात्र, दुर्दैवाने हाच तिचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर तिने पुन्हा कधीही कॅमेऱ्यासमोर येण्याचा प्रयत्न केला नाही.

२०१२ मध्ये रीमा सेनने उद्योगपती शिव करण सिंग यांच्याशी एका खाजगी सोहळ्यात लग्न केले. त्यानंतर २०१३ मध्ये तिने मुलगा रुद्रवीरला जन्म दिला.

अनेक अभिनेत्री लग्न आणि करिअरमध्ये ताळमेळ राखतात, पण रीमाने पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. तिने आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले.

आज रीमा सेन मीडिया आणि ग्लॅमरपासून दूर दिल्लीत आपले शांत जीवन जगत आहे. सोशल मीडियावरही ती जास्त सक्रीय नाही.

रीमा सेन ४४ व्या वर्षीही प्रचंड सुंदर दिसते. रीमा सेनचा जन्म १९८१ मध्ये कोलकाता येथे झाला होता. शिक्षण पुर्ण केल्यानंतर रीमा मॉडेलिंग आणि जाहिरातीसांठी काम करत होती. यानंतर ती अनेक बंगाली चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसली. रीमा सेनने 'चित्रम' या तेलुगू चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. रीमा सेनचा हा चित्रपट हिट ठरला होता.

















