PHOTO: 'हिरवा निसर्ग, हरिण, ससे अन्...' लाडक्या बाप्पासाठी अभिनेत्रीने केला जंगलाचा खास देखावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 16:44 IST2024-09-09T16:36:27+5:302024-09-09T16:44:28+5:30
अभिनेत्री श्वेता महाडिकने मराठीसह हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

अभिनयासोबतच एक कंन्टेट क्रिएटर अशी श्वेता महाडिकची ओळख आहे.
आपल्या अनोख्या संकल्पनेतून ती बनवत असलेल्या वैविध्यपूर्ण वस्तू नेहमीच नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतात.
श्वेता ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उमा भेंडे यांची सून आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती त्याद्वारे वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते.
श्वेता महागड्या पर्स, इअर रिंग्ज, डिझायनर कपडे कमी खर्चात कसे तयार करता येतील याच्या आयडिया चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर आपल्या घरातील लाडक्या गणरायाचे फोटोज चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यंदा श्वेताने तिच्या घरी जंगलाचा देखावा उभारला आहे.
गेल्या महिन्याभरापासून अभिनेत्री गणेशाची मूर्ती साकारताना दिसतेय. सभोवताली हिरवा निसर्ग, हरिण, ससे आणि बाप्पाची सुबक मूर्ती असं विहंगम दृश्य तिने आपल्या कलाकृतीच्या साहाय्याने निर्माण केलं आहे.
श्वेता महाडिकने सध्या कलाविश्वातून जरी ब्रेक घेतला असला तरी देखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
विशेष म्हणजे या गणेश चतुर्थीला अभिनेत्रीने सोशल मीडियावर १ मिलीयन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे.