कुठे गेली 'गलगले निघाले'मधली भरत जाधवची हिरोईन गौरी? आता इतकी बदलली की ओळखताही येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:25 IST2025-09-11T14:20:52+5:302025-09-11T14:25:46+5:30

भरत जाधव यांच्यासोबत अभिनेत्री केतकी थत्ते मुख्य भूमिकेत झळकली होती. या सिनेमात तिने गौरी हे पात्र साकारलं होतं.

भरत जाधव यांच्या अनेक गाजलेल्या आणि लक्षात राहणाऱ्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'गलगले निघाले'. हा सिनेमा अजूनही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे.

या सिनेमात भरत जाधव यांच्यासोबत अभिनेत्री केतकी थत्ते मुख्य भूमिकेत झळकली होती. या सिनेमात तिने गौरी हे पात्र साकारलं होतं.

पण, सिनेमानंतर ती फारशी कुठे दिसली नाही. आता मात्र केतकीमध्ये खूप बदल झाला आहे.

इतक्या वर्षांनी केतकीला ओळखणंही कठीण झालं आहे. इतकी ती बदलली आहे.

केतकी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनादेखील आहेत. तिने अनेक नाटक,मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

अभिनेत्री असण्यासोबतच केतकी एक उद्योजिकादेखील आहे. तिचा स्वत:चा व्यवसाय आहे.

केतकी पहिल्यापेक्षा आता खूपच जास्त ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावरही ती सक्रिय असल्याचं दिसून येतं.

अनेकदा केतकी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.