'सुंदरा मनामध्ये भरली'मधील दौलत अन् 'माझी तुझी रेशीमगाठ' शेफालीमध्ये आहे खास नातं; तुम्हाला माहितीये का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 15:26 IST2022-11-15T15:06:38+5:302022-11-15T15:26:47+5:30
Tv actors: शेफाली आणि दौलत या दोघांचं फॅमेली रिलेशन काय आहे ते पाहुयात.

छोट्या पडद्यावर गाजलेल्या दोन लोकप्रिय मालिका म्हणजे 'सुंदरा मनामध्ये भरली आणि माझी तुझी रेशीमगाठ'.
या दोन्ही मालिकांमध्ये कथानकासोबतच त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
त्यामुळेच आज या दोन्ही मालिकांमधील शेफाली आणि दौलत या दोघांचं फॅमेली रिलेशन काय आहे ते पाहुयात. (फोटो इन्स्टाग्राम)
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अभिनेत्री काजल काटे ही शेफालीची भूमिका साकारते आहे. (फोटो इन्स्टाग्राम)तर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिनेता हृषिकेश शेलार याने दौलतची भूमिका साकारली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
तर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिनेता हृषिकेश शेलार याने दौलतची भूमिका साकारतोय. (फोटो इन्स्टाग्राम)
विशेष म्हणजे हृषिकेश आणि काजल यांच्यात कौटुंबिक नातं असून हृषिकेशच्या पत्नीमुळे हे नातं निर्माण झालं आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
हृषिकेशची पत्नीदेखील त्याच्याप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
हृषिकेशच्या पत्नीचं नाव स्नेहा असून ती शेफालीची म्हणजेच अभिनेत्री काजल काटेची सख्खी बहीण आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
काजल, स्नेहाची धाकटी बहिण आहे. लवकरच काजल मावशी होणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
स्नेहा आणि काजल बहिणी असल्यामुळे काजल ही हृषिकेशची मेहुणी लागते.(फोटो इन्स्टाग्राम)
स्नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती काजल आणि हृषिकेशसोबतचे फोटो शेअर करत असते.(फोटो इन्स्टाग्राम)