अन् त्यानंतर तब्बल तीन दिवस समांथाने स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 08:00 IST2023-04-28T08:00:00+5:302023-04-28T08:00:01+5:30

समांथाने 2017 मध्ये नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्नगाठ बांधली आणि लग्नाच्या चार वर्षानंतर २०२१ मध्ये या दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला.

समांथा रूथ प्रभू ही साऊथची मोठी अभिनेत्री. केवळ तेलगू इंडस्ट्रीतच नाही तर जगभरात तिचे चाहते आहेत. तिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. (फोटो इन्स्टाग्राम)

समांथाचा मोठा चाहतावर्ग आहे. आज अभिनेत्री आपला 36वा वाढदिवस साजरा करते आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

समांथाने 2017 मध्ये नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्नगाठ बांधली आणि अचानक चर्चेत आली. या ग्रँड वेडिंगची अनेक दिवस चर्चा होती. पण चार वर्षांतच सामंथा व नागा यांच्यात असं काही बिनसलं की, दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. (फोटो इन्स्टाग्राम)

घटस्फोटानंतर समांथा सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करते आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

समांथा तशी मेहनती अभिनेत्री. प्रत्येक भूमिका साकारताना ती त्यात जीव ओतते. एका भूमिकेसाठी तर समांथाने स्वत:ला चक्क तीन दिवस खोलीत कोंडून घेतलं होतं. (फोटो इन्स्टाग्राम)

‘फॅमिली मॅन 2’ या वेबसीरिजमधील राजीची भूमिका साकारणं तिच्यासाठी सोप नव्हतं. ही भूमिका साकारण्यासाठी ती ती दिवस नुसती डॉक्यूमेंट्रीज पाहत होती. तीन दिवस तिने स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं होतं.(फोटो इन्स्टाग्राम)

‘फॅमिली मॅन 2’मध्ये सामंथाने रंगवलेल्या राजीच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं. तिची भूमिका मनोज वाजपेयीने साकारलेल्या श्रीकांत तिवारीच्या भूमिकेवरही भारी पडली होती.(फोटो इन्स्टाग्राम)

सामंथा साऊथची सर्वाधिक महागडी अभिनेत्री आहे. एका सिनेमासाठी ती 2 ते 5 कोटी रूपये घेते. आज तिच्याकडे 80 कोटींची प्रॉपर्टी आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

सामंथाकडे अनेक मोठे सिनेमे आहेत. डिजिटली अनेक मोठे प्रोजेक्ट ती करणार आहे. इतकंच नाही, एका हॉलिवूड सिनेमातही तिची वर्णी लागली आहे.लवकरच समांथा वरुण धवनसोबत 'सिटाडेल'मध्ये दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)