दीपिका पादुकोण होणार गोव्याला रवाना, शूटिंगला करणार सुरूवात, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 17:48 IST2020-09-09T17:42:22+5:302020-09-09T17:48:23+5:30
आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी दीपिका गोव्याला जाणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच शकुन बत्राच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा आणि इतर माहिती सध्या गुलदस्त्यात आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अभिनेत्री 11 सप्टेंबरला या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईहून गोव्याला रवाना होणार आहे.
सूत्रांनुसार, “दीपिका मुंबईतील आपल्या ब्रँड कमिटमेंट पूर्ण करून 11 सप्टेंबरला गोव्यासाठी निघेल. टीम एकत्र येऊन चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीची पूर्व तयारी पूर्ण करतील आणि काही दिवसातच चित्रीकरण सुरू करण्यात येईल."
लॉकडाउनच्या दरम्यान, दीपिकाने आपल्या व्यक्तिरेखेच्या तयारीसाठी काही ऑनलाईन योग सेशन्समध्ये देखील भाग घेतला होता.
मात्र, तिच्या व्यक्तिरेखेविषयी आणि चित्रपटाविषयीची इतर माहिती निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे.
शकुनच्या या चित्रपटाव्यतिरिक्त, दीपिका 'इंटर्न'च्या रीमेक आणि नाग अश्विनद्वारे दिग्दर्शित प्रभास सोबत एका चित्रपटात दिसणार आहे जो संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा बहुभाषी प्रॉजेक्ट असणार आहे.
या व्यतिरिक्त दीपिका पादुकोण द्रौपदीमध्ये देखील दिसणार आहे.