'कुछ ना कहो' मधला चिमुकला आठवतोय? साकारलेली ऐश्वर्याच्या लेकाची भूमिका; आता कसा दिसतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 18:02 IST2025-08-29T17:54:38+5:302025-08-29T18:02:29+5:30

विशेष म्हणजे हा चिमुकला प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा भाचा आहे.

२००३ साली आलेला 'कुछ ना कहो' सिनेमा आठवतोय? अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही जोडी यामध्ये दिसली होती. अभिषेकने याच सिनेमादरम्यान ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली होती.

या सिनेमा ऐश्वर्या रायच्या लेकाच्या भूमिकेत हा चिमुकला दिसला होता. गोरे गाल , घारे डोळे, उंच असा त्याचा क्युट लूक होता. सिनेमात त्याची आदित्य श्रीवास्तव ही व्यक्तिरेखा होती.

आता हा मुलगा कसा दिसतो आणि काय करतो याची उत्सुकता अनेकांना असेल. तसंच त्याचं खरं नाव काय माहितीये का?

तर ऐश्वर्याच्या मुलाच्या भूमिकेत दिसलेला हा होता बालकलाकार पार्थ दवे. मास्टर पार्थ दवे अशीही त्याची ओळख होती. आज पार्थ कुठे गायब आहे असाच प्रश्न अनेकांना पडला आहे.

पार्थने इतरही काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'ब्लॅकमेल', 'जोधा अकबर', 'मुझसे शादी करोगी', 'चुरा लिया है तुमने', 'किडनॅप' यासारख्या सिनेमांमध्ये तो दिसला आहे.

पार्थ दवे आता ३१ वर्षांचा आहे. आता तो फिल्मी झगमगाटापासून दूर आहे. गेल्या वर्षीच तो राजस्थानातील उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकला. इन्स्टाग्रामवर त्याच्या लग्नाचे फोटो आहेत.

पार्थ आता सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे. तो त्याचा स्वत:चा व्यवसाय करतो. विशेष म्हणजे पार्थ हा क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पांड्या यांचा भाचा आहे. पूर्वीपासून त्याने दोन्ही मामांसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.