दोन मुलांची आई असल्याने कोणीच काम देईना; चाहत खन्ना झाली बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 14:51 IST2021-06-25T14:43:15+5:302021-06-25T14:51:25+5:30

बडे अच्छे लगते है या मालिकेतून घराघरात पोहोचलेली चाहत खन्ना सध्या एक ना अनेक अडचणींचा सामना करतेय. होय, सध्या तिच्याकडे काम नाहीये.

बडे अच्छे लगते है या मालिकेतून घराघरात पोहोचलेली चाहत खन्ना (Chahatt Khanna) सध्या एक ना अनेक अडचणींचा सामना करतेय. होय, सध्या तिच्याकडे काम नाहीये.

खुद्द चाहतने एका ताज्या मुलाखतीत हा खुलासा केला. चाहत दोन मुलींची आई आहे. एकटीने दोन मुलींचा सांभाळ करतेय. पण सध्या ती बेरोजगार आहे.

चाहतला छोट्या पड़द्यावर कमबॅक करायचे आहे. यासाठी ती गेली दोन वर्ष सातत्याने ऑडिशन देत आहे. परंतु तरी देखील तिला काम मिळत नाहिये.

दोन मुलींची आई असल्याने कोणताही निर्माता मला काम देण्यास तयार नाही. माझी मार्केट व्हॅल्यू संपल्याचे निर्माते मला सांगतात. तुझ्याासारखा दोन मुलांच्या आईला पडद्यावर हिरोईन म्हणून पाहण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे तू अभिनयाऐवजी दुसरी एखादी नोकरी शोध, असा सल्ला अनेक निर्माते देतात, असे तिने या मुलाखतीत सांगितले.

चाहतने 2013 साली फरहान मिझार्सोबत लग्न केले होते. लग्नानंतर तिला मुली झाल्यात. मुली अगदीच लहान असल्याने त्यांचा सांभाळ करण्यासाठी चाहतने काही काळी छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता.

या दरम्यान ती पतीसोबत त्यांच्या फॅमेली बिझनेस सांभाळत होती. 2018 मध्ये तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून ती आपल्या दोन मुलांसोबत एकटी राहात आहे.

मुलांच्या संगोपनासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे चाहतला कामाची गरज आहे. पण हाताला काम नाही. अनेक लोक तिला मुलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचा सल्ला देतात. हे फोटो शेअर केल्यास तुला कुणी काम देणार नाही, असे सांगतात.

चाहतने 2006 साली लग्न केले होते, परंतु लग्नाच्या 7 महिन्यांनंतरच ती तिच्या पतीपासून विभक्त झाली. 2013मध्ये तिने पुन्हा लग्न केले.

बडे अच्छे लगते है या मालिकेमुळे चाहता खन्ना चांगलीच नावारूपाला आली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.

कबूल है,कुमकुम: प्यारा सा बंधन, तुझ संग प्रीत लगाई सजना ' आणि हीरो भक्ति की शक्ति है यांसारख्या मालिकेत झळकली होती. संजय दत्तच्या प्रस्थानम सिनेमात ती झळकली होती.

Read in English