९० च्या दशकातील सौंदर्यवती! तीन विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली अन् फसली, आता राजकारणात उतरली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 15:53 IST2025-08-29T14:59:31+5:302025-08-29T15:53:18+5:30

९० च्या दशकातील सौंदर्यवती! तीन विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली अन् फसली, आता उतरलीये राजकारणाच्या आखाड्यात

कलाकारांची प्रेम प्रकरणं, लग्न आणि घटस्फोट या गोष्टी कायम चर्चेचा विषय ठरतात.बॉलिवूड इंडस्ट्रीत असेही कलाकार सापडतील जे त्यांच्या अभिनय कारकीर्दीपेक्षा लव्ह लाईफमुळे चर्चेत आले. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री नगमा.

९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नगमा. बॉलिवूडसह टॉलिवूडमधील आघाडीच्या नायकांसोबत तिने काम केलं. त्यावेळी, या सौंदर्यवतीने माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, रवीना टंडन सारख्या अनेक अभिनेत्रींना कॉंटे की टक्कर दिली होती.

१९८० मध्ये नगमाने सलमान खानच्या 'बागी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. या चित्रपटानंतक नगमाने यादगार , सुहाग या सिनेमांमध्येही काम केलं.याशिवाय तिने तमिळ, तेलुगु आणि भोजपूरी चित्रपटांमध्ये देखील काम केलं.

नायिका म्हणून प्रचंड लोकप्रियता आणि स्टारडम अनुभवणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव प्रसिद्ध क्रिकेटरपटू सौरव गांगुलीसोबत जोडण्यात आलं होतं. दोघांची भेट १९९९ च्या विश्वचषकादरम्यान झाली होती. त्यावेळी सौरव गांगुली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता आणि तो विवाहितही होता.

त्यानंतर अभिनेत्री तमिळ अभिनेते यांच्या प्रेमात पडली, असं म्हटलं जातं. मात्र, हे नातं देखील फार काळ टिकू शकलं नाही.

भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करत असताना, नगमाला भोजपुरी स्टार रवी किशनच्या प्रेमात पडले. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे. पण, रविकिशन विवाहित असल्यामुळे हे नातं सुद्धा संपुष्टात आलं.

सध्या नगमा अविवाहित असून ती कलाविश्वापासून दूरावली आहे. सिनेसृष्टीला रामराम केोल्यानंतर अभिनेत्रीने राजकारणाची वाट धरली. २००४ मध्ये तिने कॉग्रेस पक्षासाठी प्रचार केला होता. ती कॉंग्रेस पक्षाची सदस्य असून अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. मात्र, या क्षेत्रातही ती फारशी कमाल दाखवू शकली नाही.