तरुणांना लाजवेल अशी तगडी शरीरयष्टी! सलमानच्या फिटनेसचं रहस्य काय? रोज न चुकता करतो 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:05 IST2025-12-27T17:47:39+5:302025-12-27T18:05:18+5:30

सलमान खान इतका फिट कसा दिसतो? जाणून घ्या त्याच्या फिटनेसचं रहस्य

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून सलमान खानकडे पाहिलं जातं. सलमान खान हा त्याच्या अभिनयासह फिटनेसमुळे सुद्धा तितकाच चर्चेत असतो.

सलमान खान हा चाहत्यांमध्ये फिटनेस आयकॉन म्हणूनही ओळखला जातो.त्याची दिनचर्या, आहार व जीवनशैली इतकी संतुलित आणि नैसर्गिक आहे की, सर्व वयोगटांतील लोक त्याच्याकडून प्रेरणा घेऊ शकतात.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा आज, २७ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. सलमानने साठीत पदार्पण केलं आहे.वयाच्या ६० व्या वर्षीही तो तरुणांना लाजवेल इतका फिट आहे.

जेव्हा सलमान खानचे शर्टलेस फोटो समोर येतात, तेव्हा चाहते त्याच्या पिळदार शरीरयष्टीची आणि सिक्स-पॅक ॲब्सची प्रशंसा केल्याशिवाय राहत नाहीत.सलमान खान कायम बॅलेंस्ड डाएट फॉलो करतो. त्याच्या डाएटमध्ये फळे, भाज्या, प्रोटीनयुक्त पदार्थ, यासह हेल्दी फॅट्सयुक्त पदार्थांचा समावेश असतो. या डाएटमुळे त्याला पिळदार बॉडी तयार करण्यास मदत मिळते.

सलमानचा फिटनेस ट्रेनर राकेश उदियार याने त्याच्या फिटनेसबाबत अनेकदा खुलासे केले आहेत.गेली २० वर्ष तो अभिनेत्यासोबत आहे.

राकेशच्या सांगण्यानुसार, सलमान आजही जुन्या पद्धतीच्या बॉडीबिल्डिंग तंत्रांचा अवलंब करतो, ज्यांना 'जायंट सेट ट्रेनिंग' म्हणून ओळखले जाते. सलमान दररोज न चुकता पुश-अप्स आणि चेस्ट वर्कआऊट असे अनेक व्यायाम प्रकार करतो.

व्यायाम आणि आहार योग्य प्रमाणात ठेवणारा सलमान स्वतःला कायम स्टीरॉईडसारख्या कृत्रिम गोष्टींपासून लांब ठेवतो.