क्रिकेट सोडून बॉलिवूडमध्ये, नोराचं हृदय तोडलं; प्रेयसी गर्भवती राहताच तीन दिवसांत उरकलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:47 IST2026-02-06T18:20:08+5:302026-02-06T18:47:10+5:30
नोरा फतेहीचं हृदय तोडणारा तो अभिनेता कोण? क्रिकेटचं मैदान सोडून बॉलिवूडमध्ये नाव कमावलं!

बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे असतात जे पडद्यावर अत्यंत साधे, शांत आणि 'फॅमिली मॅन' दिसतात. पण, त्यांचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं.

यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता अंगद बेदी. माजी भारतीय क्रिकेट कर्णधार बिशन सिंग बेदी यांचा मुलगा असलेल्या अंगदचा आज ६ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे.

अंगद बेदीने स्वतःच्या एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला होता. पत्नी नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या शोमध्ये अंगदने कबूल केले की, त्याने लग्नाआधी ७५ महिलांना डेट केले होते. विशेष म्हणजे, यामध्ये त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या महिलांचाही समावेश होता.

सुरुवातीला अत्यंत लाजाळू असलेल्या अंगदने दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर आपले आयुष्य पूर्णपणे बदलल्याचे सांगितले. "मी लाजाळू होतो, पण स्वतःला शोधण्याच्या प्रवासात अनेक नात्यांमध्ये अडकत गेलो" असे त्याने स्पष्ट केले होते.

अंगद बेदी आणि डान्सिंग क्वीन नोरा फतेही यांच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी बॉलिवूडमध्ये रंगत होत्या. दोघे अनेक कार्यक्रमात एकत्र दिसायचे. मात्र, त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.

नोराशी ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच अंगदचे नाव नेहा धुपियाशी जोडले गेले. नोराने एका मुलाखतीत म्हटले होते की, या ब्रेकअपमुळे ती पूर्णपणे तुटली होती आणि दोन महिने ती डिप्रेशनमध्ये होती.

अंगद आणि नेहा धुपियाची लव्हस्टोरीदेखील एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. १० मे २०१८ रोजी त्यांनी गुपचूप लग्न केले होते.

याचे कारण असे होते की, नेहा लग्नाआधीच गर्भवती होती. जेव्हा नेहाने अंगदला ही बातमी दिली, तेव्हा अंगदने ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली.

नेहाच्या गरोदरपणामुळे तिच्या वडिलांनी अत्यंत संतापून या जोडीला केवळ ३ दिवसांत लग्न करण्याचे आदेश दिले होते. लग्नानंतर अवघ्या ६ महिन्यांतच नेहाने मुलगी 'मेहेर'ला जन्म दिला.

दिग्गज फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचा मुलगा असल्याने अंगदने आपल्या करिअरची सुरुवात क्रिकेटपासून केली होती. तो दिल्लीच्या अंडर-१९ संघातून खेळला. मात्र, त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आणि मॉडेलिंग व अभिनयाकडे वळला.

२००४ मध्ये 'काया तरण' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'पिंक', 'टायगर जिंदा है' आणि 'डियर जिंदगी' यांसारख्या चित्रपटांतील त्याच्या कामाचे विशेष कौतुक झाले.

















