मराठी मुलासोबत अमरीश पुरींच्या लेकीने थाटलाय संसार, अभिनय क्षेत्रापासून दूर राहून करते हे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:46 IST2025-05-30T11:18:58+5:302025-05-30T11:46:45+5:30
खलनायकी भूमिका गाजवणाऱ्या अमरीश पुरींची लेक अभिनय क्षेत्रापासून दूर राहून या खास क्षेत्रात यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे मराठी मुलासोबत तिने लग्न केलं आहे. जाणून घ्या

बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक अमरीश पुरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. अमरीश पुरी यांची मुलगी काय करते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
अमरीश पुरी यांना दोन मुलं असून त्यांच्या मुलाचं नाव आहे राजीव पुरी आणि मुलीचं नाव आहे नम्रता पुरी. अमरीश यांची दोन्ही मुलं मनोरंजन विश्वापासून दूर आहेत
अमरीश पुरी यांची मुलगी नम्रताने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलं पण अभिनयात नव्हे तर फॅशन इंडस्ट्रीत. नम्रताने फॅशन डिझायनिंग इंडस्ट्रीत तिचं नाव कमावलं आहे
२० ऑगस्ट १९८३ नम्रता पुरीचा मुंंबईत जन्म झाला. तिने शिरीष बागवे यांच्याशी विवाह केला असून, सध्या ती आपल्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहेत.
नम्रताचे सोशल मीडियावर १२ हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत. आपल्या सोशल मीडिया पेजवर नम्रता विविध फॅशन डिझायनिंगच्या पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
इतकंच नव्हे तर फॅशन डिझायनर म्हणून नम्रता पुरीने "Namrata Puri Bespoke" नावाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे. या ब्रँडला ग्राहक उत्तम प्रतिसाद देताना दिसतात.
अमरीश पुरी यांच्या अभिनय कारकीर्दीप्रमाणेच नम्रता पुरीने फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. फॅशन जगतात येणाऱ्या नवोदितांसाठी नम्रताचा प्रवास प्रेरणादायी आहे