घटस्फोटानंतर बॉलिवूड कपल पुन्हा आले एकत्र, या कारणामुळे घ्यावा लागला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 15:45 IST2021-03-16T15:15:09+5:302021-03-16T15:45:47+5:30
Konkana Sen sharma & Ranvir shorey re-unites. रणवीर शौरीसोबत रिलेशनशीपमध्ये असताना कोंकणा प्रेग्नेंट राहिली.

रणवीर शौरीसोबत रिलेशनशीपमध्ये असताना कोंकणा प्रेग्नेंट राहिली.
मग त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि २०१० साली ते दोघे विवाहबंधनात अडकले.
त्याच्या काही महिन्यांनंतर कोंकणाने एका मुलाला जन्म दिला. या मुलाचे नाव हारून आहे
मात्र कोंकणा आणि रणवीरचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.
२०१५ साली कोंकणाने रणवीर शौरीसोबत वेगळे होत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले. तिचा हा निर्णय ऐकून चाहते हैराण झाले.
वेगळे झाल्यानंतर पाच वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. मुलाची कस्टडी कोंकणाकडे देण्यात आली.
पण त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांना जाणवले असावे.दोघांचा घटस्फोटाचा परिणाम मुलावरही होत होता.
अखेर रणवीर शौरी आणि कोंकणा सेनशर्मा हे दोघंही त्यांच्या मुलासाठी पुन्हा एकत्र आले आहेत.
मुलगा हारून चा १० वा वाढदिवस रणवीर आणि कोंकणानं एकत्र साजरा केला.
या सेलिब्रेशनचा एक फोटो रणवीरनं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आणि कोंकणा मुलासह फुल्ल ऑन एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे.