बॉलिवूडला रामराम करत ही अभिनेत्री बनलीय पॉवरफुल बिझनेस वुमन, आता दिसते अशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 18:01 IST2025-07-18T17:56:53+5:302025-07-18T18:01:15+5:30
बॉलिवूडची ही अभिनेत्री अचानक रुपेरी पडद्यावरून गायब झाली.

यशराज बॅनरचा 'मेरे यार की शादी है' हा चित्रपट आठवत असेल ना. या चित्रपटात एक नवीन चेहरा दिसला होता. हा चेहरा होता ट्यूलिप जोशीचा. या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणारी अभिनेत्री ट्यूलिप जोशी उदय चोप्रा यांच्यासोबत झळकली होती.
सुपरहिट चित्रपटातून सुपरहिट पदार्पण करणाऱ्या ट्यूलिप जोशीकडून खूप अपेक्षा होत्या. असे वाटत होते की ती जास्त काळ इंडस्ट्रीवर राज्य करेल पण तसे झाले नाही.
ट्युलिप जोशी अचानक रुपेरी पडद्यावरून गायब झाली. पण तिने निवडलेल्या सिनेमांमुळे ती यशाच्या शिखरावर पोहोचली. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ट्युलिप आता करोडोंचा व्यवसाय सांभाळत आहे.
ट्युलिप जोशीला सिने पार्श्वभूमी नाही. पायल खन्नामुळे तिला चित्रपटांमध्ये प्रवेश मिळाला. पायल खन्ना ही आदित्य चोप्राची पहिली पत्नी आहे. आदित्य आणि पायलच्या लग्नादरम्यान सर्वांच्या नजरा ट्युलिप जोशीवर पडल्या आणि तिला चित्रपटाची ऑफर आली.
ट्युलिप जोशीसाठी हिंदी चित्रपटात काम करणे सोपे नव्हते. तिला हिंदी चांगले येत नव्हते. चित्रपटात काम करण्यापूर्वी तिला हिंदीचे धडे गिरवावे लागले.
ट्युलिप जोशीचा पहिला चित्रपट 'मेरे यार की शादी है' खूप हिट झाला. पण त्यानंतर तिला काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
काही लोकांनी तिला तिचे नाव बदलण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर ट्युलिप जोशीने तिचे नाव बदलून अंजली असे ठेवले. पण या बदलामुळेही तिला फायदा झाला नाही.
जेव्हा तिचे नशीब हिंदी चित्रपटांमध्ये फारशी कमाल दाखवू शकले नाही, तेव्हा ट्युलिप जोशीने तेलुगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम मिळवण्याचा प्रयत्न केला. तिलाही काम मिळाले. पण तिला फारसे यश मिळाले नाही.
त्यानंतर २०१५ मध्ये ट्युलिप जोशीने सिनेइंडस्ट्रीला रामराम केला. चित्रपट सोडल्यानंतर तिने कॅप्टन विनोद नायरशी लग्न केले. जो व्यवसायाने एक बिझनेसमन होता.
पतीसोबत ट्यूलिप जोशीने एक कन्सल्टिंग फर्म सुरू केली. ही कन्सल्टिंग फर्म सुमारे ६०० कोटींची आहे. ट्यूलिप जोशी त्याची डिरेक्टर आहे.