दर दोन महिन्याला फिलर्स लावते, गरज वाटली तर प्लास्टिक सर्जरीही करेन; ज्येष्ठ अभिनेत्रीचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:22 IST2025-07-02T14:16:00+5:302025-07-02T14:22:27+5:30
सुंदर दिसणार असू तर काय हरकत आहे? ज्येष्ठ अभिनेत्रीचं आश्चर्यकारक विधान

१९६० ते ७० च्या दशकात हिंदी फिल्म इंडस्ट्री गाजवणाऱ्या अभिनेत्री मुमताज. त्याकाळी त्यांनी अनेक मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं. स्क्रीनवर रोमान्स केला. त्यांच्या सौंदर्यावर सगळेच घायाळ व्हायचे.
आज मुमताज ७७ वर्षांच्या आहेत. आजही त्यांचं सौंदर्य कायम आहे. त्यांनी आपल्या फिटनेस आणि सौंदर्याचं रहस्य सांगितलं. तसंच कॉस्मेटिक फिलर्स आणि प्लास्टिक सर्जरीवरही भाष्य केलं.
बॉम्बे टाईम्सशी बोलताना मुमताज म्हणाल्या, "मी संध्याकाळी ७ नंतर काही खात नाही. रोज किमान तासभर तरी व्यायाम करते. पौष्टिक जेवते. जर तुम्ही व्यायाम करणार नाही तर तुम्ही चांगले दिसणार नाही असं मला वाटतं."
"मी फेसलिफ्ट वगरे काही केलेले नाही. पण जेव्हा मी खूप थकते तेव्हा चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला फिलर्स करुन घेते. एक दोन महिने ते टिकतं. दर चार महिन्याला एकदा मी हे करते."
"मला अजूनपर्यंत प्लास्टिक सर्जरी करायची गरज वाटलेली नाही. जर तुम्हाला वाटतंय की तुमच्यात काहीतरी कमी आहे तर ते ठीक करा. बदल करणं यात काहीच गुन्हा करत नाही. प्रत्येकालाच सुंदर आणि चांगलं दिसायचं आहे."
"जर मला वाटलं की मला काही कॉस्मॅटिक सर्जरी करायची आहे, काही बदल करायचे आहेत तर मी नक्की करेन. प्लास्टिक सर्जरी करावी लागली तर तीही करेन. कारण जर ते मला सुंदर बनवणार असेल तर काय हरकत आहे. प्रत्येकाने केलं पाहिजे."
नुकतंच अभिनेत्री शेफाली शाहचा वयाच्या ४२ व्या वर्षी मृत्यू झाला. तिने अँटी एजिंग गोळ्या घेतल्याचा खुलासा झाला होता. हे चर्चेत असताना आता मुमताज यांनी आश्चर्यकारक विधान केलं आहे.