बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:49 IST2025-06-10T17:43:14+5:302025-06-10T17:49:46+5:30

फोटोज आणि व्हिडिओज विकून एका अॅपद्वारे कोटी रुपये कमावल्याचा खुलासाही खुशीने केला.

टीव्ही अभिनेत्री खुशी मुखर्जी तिच्या अभिनयापेक्षा बोल्डनेसमुळेच जास्त चर्चेत असते. खुशीचे अनेक बोल्ड व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं जातं.

नुकतीच खुशीने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला.

फोटोज आणि व्हिडिओज विकून एका अॅपद्वारे कोटी रुपये कमावल्याचा खुलासाही खुशीने केला.

"२०२२च्या सप्टेंबर महिन्यात फोटो, व्हिडिओज विकून एका वेबसाईटच्या मदतीने १० कोटी कमावले, हे खरं आहे का?", असा प्रश्न तिला विचारण्यात आला.

यावर खुशी म्हणाली, "हो हे खरं आहे. मी माझं स्वत:चं 'खुशी मुखर्जी डॉट कॉम' हे अॅप बनवलं होतं. आताही हे अॅप आहे".

"पण, आता आम्ही कंटेट बदलला आहे. तेव्हा पण असा काही आक्षेपार्ह कंटेट आम्ही टाकत नव्हतो. वेब सीरिजपेक्षा काही वेगळं टाकत नव्हतो".

"खूप चाहते असे होते ज्यांना माझ्याशी बोलायचं असायचं. आजकाल सगळ्या कलाकारांनी स्वत:चं अॅप सुरू केलं आहे".

"फोटोज, व्हिडिओज तिथे पोस्ट केले जायचे. अनेकांनी ते व्हिडिओज अनलॉक केले होते".

"त्यासाठी पैसे द्यावे लागायचे. एका चाहत्याने तो भारतातील नव्हता...त्याने ४-५ वेळाच अॅप उघडून १ कोटी १३ लाख रुपये खर्च केले", असं खुशी मुखर्जी म्हणाली.