दोन घटस्फोटांनंतर लोकप्रिय अभिनेत्री म्हणाली, "भले चार लग्न करेन, मला लाज वाटत नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:33 IST2025-06-07T16:28:10+5:302025-06-07T16:33:46+5:30
अभिनेत्री शाहरुख, सलमानसह अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.

'बादशाह', 'पार्टनर', 'सिर्फ तुम' या सिनेमांमध्ये दिसलेली ही लोकप्रिय अभिनेत्री. नुकतीच अभिनेत्रीने मुलाखत दिली आणि ती चर्चेत आली आहे.
दोन घटस्फोटांनंतरही अभिनेत्री वयाच्या ४७ व्या वर्षी प्रेमाच्या शोधात आहे. तसंच कितीही वेळा लग्न करेन, मला लाज वाटत नाही असं ती मुलाखतीत म्हणाली.
ही अभिनेत्री दीपशिखा नागपाल (Deepshikha Nagpal). इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत दीपशिखा म्हणाली, "मी तीन, चार वेळाही लग्न करु शकते. मला यात काही लाज वाटत नाही. मी माझं आयुष्य जगते आहे."
"जेव्हा मी दोन लोकांना पाहते आणि त्यांचं एकमेकांशी पटत नसतं तेव्हा मला वाईट वाटतं. मीही कदाचित माझ्या पहिल्या दोन्ही पतींसाठी योग्य नव्हते."
"मी नेहमीच चुकीच्या कारणांमुळे लग्न केलं. लग्न करताना तुम्ही ते का करताय याचं योग्य कारण असलं पाहिजे. म्हणूनच मला प्रत्येक गोष्टीसाठी पार्टनरला दोष देत नाही."
"मी खूप रोमँटिक व्यक्ती आहे. माझा प्रेमावर, रोमान्सवर, लग्नावर विश्वास आहे. पण जर तुमचं पार्टनरशी पटत नसेल तर तुम्ही दूर होऊन आपापलं जीवन जगायला पाहिजे. प्रत्येकाला तो अधिकार आहे. चुकीच्या नात्यात असणंही एक आव्हानच आहे."
"मला नात्यात यायला आणि नंतर त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. हाच माझा पॅटर्न आहे. पण हा पॅटर्न तोडावा असं मला कुठेतरी वाटलं. म्हणून मी बौद्ध पद्धतीचं जीवन आत्मसात केलं आहे."
"मी आता स्वत:वर खूप काम केलं आहे. भलेही मी सात वर्षांपासून एकटी आहे पण मला नाही वाटत की 'देवा, माझ्यासोबत कोणीतरी हवं होतं.' योग्य व्यक्ती येईल तेव्हा येईल. तोवर हे ठीक आहे."