ऐश्वर्या नाही तर 'ही' आहे अभिषेक बच्चनच्या आयुष्यातली सर्वात सुंदर स्त्री, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:13 IST2025-07-02T13:34:38+5:302025-07-02T14:13:33+5:30
आई नाही, बहिण नाही, पत्नी नाही... मग अभिषेकच्या आयुष्यातील "सर्वात सुंदर स्त्री" कोण आहे?

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कालीधर लापता' ( Kaalidhar Laapata) असं त्याच्या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा ४ जुलैला झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.
अभिषेक बच्चन हा 'कालीधर लापता' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कुठलीही कसर सोडत नाहीये. तो विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका खास मुलाखतीमुळे (Kaalidhar Laapata Promotion Interview) अभिषेक चर्चेत आला आहे.
अभिषेक बच्चन याने अलिकडेच हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या आपल्या आयुष्यातल्या "सर्वात सुंदर स्त्री" विषयी खुलासा केलाय.
अनेकांना वाटलं असेल की, तो त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचा (Aishwarya Rai Bachchan) उल्लेख करेल, मात्र त्याने वेगळचं नाव घेतलं.
हॉलिवूड रिपोर्टरशी बोलताना अभिषेकनं तो 'कालीधर लापता'मधील पात्राशी वैयक्तिक आयुष्यामुळे जोडला गेल्याचं सांगितलं. व्यक्तिरेखेबद्दल बोलताना तो म्हणाला,"ही कथा अशा एका माणसाची आहे, जो आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात घालवतो. मात्र नंतर त्याला लक्षात येतं की, त्याने स्वतःसाठी काहीही केलं नाही".
पुढे तो म्हणाला, "या भूमिकेचं जे मला सर्वाधिक भावलं, ते म्हणजे, अधुरी राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कधीच उशीर होत नाही. याकडे मी मध्यमवयीन संकट म्हणून पाहत नाही. कारण, आपल्यापैकी अनेकांनी आपापल्या कुटुंबासाठी खूप काही त्याग केलेला असतो. आणि अखेरीस असं वाटतं की, आपण सर्व काही दिलं, पण स्वतःसाठी काहीच उरलं नाही.त्यातला साधेपणा भावला".
अभिषेक बच्चनने नुकतीच चित्रपटसृष्टीत २५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्याने त्याच्या दीर्घ कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या असल्या तरी वडील म्हणून कमी भूमिका साकारल्या आहेत. त्याचा 'कालीधर लापता' देखील याच विषयावर आधारित आहे.
पुढे अभिषेकनं खुलासा केला की त्याची मुलगी आराध्या हीच आयुष्यातली "सर्वात सुंदर स्त्री" (Abhishek Bachchan Calls Daughter Aaradhya Bachchan Most Beautiful Woman In His Life ) आहे. त्याच्या मते एक संवेदनशील वडील, एक समंजस कलाकार आणि एक प्रेमळ व्यक्ती म्हणून त्याचं वेगळं आणि भावनिक व्यक्तिमत्त्व समोर आराध्यामुळं समोर येतं.
अभिषेक म्हणाला, "मला वाटत नाही की मी अशा भूमिकांसाठी सक्रियपणे प्रयत्न करत होतो. पण मला एक समान धागा दिसला आहे आणि मी जगातील सर्वात सुंदर स्त्री, माझ्या मुलीचा ऋणी आहे. कलाकार आयुष्यात अनेक टप्प्यांतून जातात आणि जेव्हा मी 'ब्रीद', नंतर 'लुडो', 'बॉब', 'बी हॅपी', 'आय वॉना टॉक', 'कालिधर लापता' या चित्रपटांपासून सुरुवात केली, तेव्हा मला त्याच्यातील पितृत्वाची भावना समजली. कारण मी माझ्या वास्तविक जीवनातही ते अनुभवत होतो आणि अनुभवत होतो. जर आराध्या नसती तर मी अजूनही त्या भावना अनुभवू शकलो असतो का? किंवा त्याच तीव्रतेने त्या मांडू शकलो असतो की? हे माहिती नाही. पण, ते पात्र माझ्याशी बोलायचे कारण मी तिच्यासोबत ते अनुभवलं होतं".
अभिषेकने जानेवारी २००७ मध्ये झालेल्या 'गुरु' सिनेमाच्या प्रीमिअरनंतर हॉटेलच्या बालकनीमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं. त्यानंतर प्रीमिअरहून परतल्यानंतर दोघांनी अमिताभ बच्चन यांच्या घरी १४ जानेवारी २००७ रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर २० एप्रिल २००७ रोजी दोघे लग्नाच्या बेडीत अडकले होते. लग्नाच्या तिन वर्षानंतर त्यांनी २०११ मध्ये मुलगी आराध्याला जन्म झाला. अलिकडेच आराध्या १९ मार्च २०२५ रोजी १३ वर्षांची झाली आहे.