विमलचा मराठमोळा ठसका पाहिलात का? नऊवारी साडी नेसून वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:34 IST2022-04-21T18:30:45+5:302022-04-21T18:34:14+5:30
Seema ghogale: कधी वेस्टर्न तर कधी भारतीय पद्धतीच्या वेशात सीमा फोटो शेअर करुन नेटकऱ्यांची मनं जिंकते.

आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सीमा घोगले.
या मालिकेत सीमाने विमल ही भूमिका साकारली आहे.
उत्तम अभिनयशैली आणि संवादफेक कौशल्यामुळे विमल म्हणजेच सीमा अल्पावधीत लोकप्रिय झाली.
कलाविश्वाप्रमाणेच सीमा सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते.
कधी वेस्टर्न तर कधी भारतीय पद्धतीच्या वेशात सीमा फोटो शेअर करुन नेटकऱ्यांची मनं जिंकते.
यावेळी सीमाने मराठामोळा साजशृंगार करुन तिचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत.
सीमा उत्तम नृत्यांगना असून तिने काही नाटक आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे.
'कुमारी गंगुबाई मॅट्रिक' सह सीमाने अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे.