'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या साडीतील फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 21:45 IST2021-11-24T21:07:29+5:302021-11-24T21:45:36+5:30
आई कुठे काय करतेमधील अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरचा लेटेस्ट फोटो चर्चेत आला आहे.

आई कुठे काय करतेची आई-अरुंधती अर्थात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने आपल्या अभिनयाने आणि सोज्वळ स्वभावाने चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे.
आई कुठे काय करतेमधील अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरचा लेटेस्ट फोटो चर्चेत आला आहे.
मधुराणीने साडीतील फोटो इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.
मधुराणी प्रभुलकर हिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
मधुराणी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा फोटोमुळे चर्चेत येत असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मधुराणी चाहत्यांच्या संपर्कात असते.
अभिनेत्री मधुराणीने या मालिकेपूर्वी 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही काम केले आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी सिनेमात काम केले आहे.
मधुराणीने 'आई कुठे काय करते' या मालिकेतून जवळपास १० वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक केले आहे.
मधुराणीने दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्याशी ९ डिसेंबर २००३ साली लग्न केले. त्यांना एक मुलगीदेखील आहे.