90 च्या दशकातली सुपरहिट अभिनेत्री, लग्नानंतर 160 मुलांची झाली आई ; सध्या काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 14:06 IST2024-07-15T13:53:40+5:302024-07-15T14:06:05+5:30

अभिनेत्रीचं नेटवर्थ किती? आता कुठे आहे ही अभिनेत्री?

बॉलिवूडमध्ये 90 चा काळ गाजवणारी अभिनेत्री. जी पुढे 160 मुलांची आई झाली. मात्र आजपर्यंत तिने स्वत:च्या बाळाला जन्म दिला नाही. कोण आहे ही अभिनेत्री?

तुम्हीही विचार करत असाल की नक्की कोण आहे ही १६० मुलांची आई. 90 च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री आहे आयेशा झुलका (Ayesha Jhulka).

तो काळ असा होता जेव्हा आयेशाने मिथुन चक्रवर्ती ते अक्षय कुमार, आमीर खानपर्यंत अनेक हिरोंसोबत काम केलं. अक्षय कुमारसोबतचा तिचा 'खिलाडी' गाजला. तर आमिरसोबत 'जो जिता वही सिकंदर' मध्ये ती दिसली.

आयेशा झुलका ५२ वर्षांची असून तिचा जन्म श्रीनगरमध्ये झाला. पदवी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये आली. 1989 साली आलेल्या 'कैसे कैसे लोग' मधून तिने पदार्पण केलं. यामध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं.

२००३ साली आयेशा बिझनेसमन समीर वशीसोबत लग्नबंधनात अडकली. पण दोघांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. याउलट त्यांनी गुजरातमधील दोन गावं दत्तक घेतली. तेथील एकूण 160 मुलांचा संगोपनाचा आणि शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला.

माध्यम रिपोर्टनुसार, आयेशाची एकूण संपत्ती 82 कोटी आहे. तिचा मुंबईत स्पा आणि सलून बिझनेस आहे. शिवाय ती कपड्यांच्या व्यवसायातही आहे. तिच्या क्लोदिंग ब्रँडचं नाव Additions आहे. गोव्यातही तिचं एक बुटिक आहे.