"क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो"....पाहा विद्या बालनचे भुरळ घालणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 13:19 IST2020-09-18T13:04:47+5:302020-09-18T13:19:16+5:30

वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार तितक्याच संवेदनशील भूमिका साकारत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे विद्या बालन.

विविध सिनेमांतील भूमिकांनी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवलं आहे.

विद्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचे वेगवेगळे साडीतील लूक शेअर करत असते.

तिच्या स्टाइलिश लूकमध्ये ती सगळ्यात जास्त साडीलाच पहिली पसंती देते.

तिच्या कपाटात तुम्हाला विविध प्रांतातल्या साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळेल.

कॉटन साडी, सिल्क, कांजीवरम, पैठणी, बनारसी अशा विविध प्रकारच्या विविध प्रांतातल्या साड्या परिधान करायला तिला आवडतात.

वर्षभरात विद्या 300 हून अधिक साडी खरेदी करते. विशेष म्हणजे एकदा नेसलेली साडी विद्या पुन्हा नेसत नाही.

या साड्या अशाच टाकून न देता ती नातेवाईकांना आणि नोकर मंडळींना भेट स्वरुपात देते. नातेवाईकही या साड्या बघून खुष होत असल्याचे ती सांगते.

विद्या फॅशनची फॅन नाही. अमुक एक फॅशन तिने कधीच फॉलो केलेली नाही. जी गोष्ट तिला भावते, जी आवडते, तीच तिच्यासाठी स्टाईल असते.

अशाच प्रकारे प्रत्येकाने आपली स्टाईल फॉलो करावी. माझ्या फॅशनमध्ये साडीला विशेष महत्त्व असल्याचे विद्या सांगते.

Read in English