Valentine's Day 2026 Wishes: व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या जोडीदाराला Romantic Messages, Greetings, WhatsApp Status द्वारा शुभेच्छा देऊन साजरा करा प्रेमाचा दिवस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:17 IST2026-02-13T12:12:54+5:302026-02-13T13:17:09+5:30
Happy Valentine's Day 2026 Wishes in Marathi: प्रेम व्यक्त करायला शब्दांची गरज नसते, पण एका सुंदर चित्राने भावना नक्कीच गडद होतात! या व्हॅलेंटाईन डे(Valentine's Day 2026)ला तुमच्या जोडीदाराचे मन जिंकण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, खास प्रेमाच्या रंगात न्हालेली ही फोटो गॅलरी. हे रोमँटिक मेसेजेस आणि इमेजेस शेअर करा आणि तुमचे नाते अधिक खास बनवा!

Happy Valentine's Day 2026 Wishes in Marathi
तुझ्या डोळ्यात पाहताना, मीच मला दिसते तुझ्यात असलेली मी पाहून, गालातल्या गालात हसते हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

Happy Valentine's Day 2026 Messages in Marathi
तु समोर असल्यावर, आसपास कुणी नसावं वाटतं...एकसारखं, तासनतास, पाहात बसावं! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

Happy Valentine's Day 2026 Greetings in Marathi
सुख दु:खाचा विचार करताना, मी तुलाच समोर पाहिले माझे संपूर्ण जीवनच, तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

Happy Valentine Day 2026 Whatsapp Status in Marathi
मी तुझ्यावर प्रेम करतो, हे ओठावर आणता येत नाही.. प्रेम असच असतं, जे शब्दात सांगता येत नाही! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

Happy Valentine Day Marathi Wishes
तुझ्यासाठी जन्म घेतला, तुझ्यासाठीच मरणार आहे… तुझ्यावाचून माझ्या जीवनाला, अर्थ तरी काय उरणार आहे! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

Happy Valentine's Day Shubhecha
डोळ्यांचं काय, ते नेहमीच पाणावतात... माझं तुझ्यावरचं प्रेम, अप्रत्यक्षपणे खुणावतात! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

Valentine's Day Wishes in Marathi
कधी तू, कधी मी, एकमेकांशी भांडू … राग ओसरल्यावर मात्र, पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू…! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

जगतोय तुझ्या प्रेमासाठी, हजारो संकटं झेलतोय तरी… आहेस तू सोबत म्हणून लढतोय, सोबत दुसरे कुणी नसले तरी...! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

















