जान्हवीचा ट्रेडिशनल लूकही असतो खास; पाहा 7 डिफ्रंट साडी स्टाइल्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:58 IST2019-07-25T17:53:15+5:302019-07-25T17:58:51+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

धडक चित्रपटानंतर जान्हवी आपल्या अदा, स्टाईल, लूकमुळे प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.

वेस्टर्न आणि ट्रेडीशनल अशा दोन्ही लूकमध्ये जान्हवीचं सौंदर्य खुलून येतं.

धडक चित्रपटात जान्हवीने साडी परिधान केली होती. सध्या तरुणींना जान्हवीची साडी स्टाईल खूप आवडत आहे.

तरुणींना साडी नेसायला आवडते. मात्र नेसायची जास्त सवय नसल्याने ती कॅरी करताना थोडं अवघड जातं. जान्हवीप्रमाणे साडी नेसणं तुम्हीही ट्राय करू शकता.

जान्हवीसारखं वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसून खास सण-समारंभांना तुम्ही कंफर्टेबल राहू शकता तसेच सुंदर दिसू शकता.

काही दिवसांपूर्वी जान्हवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फ्लोरल प्रिंटेड साडी नेसल्याचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये जान्हवीचा कूल लूक पाहायला मिळाला.