२०८० पर्यंत सर्व समुद्रामध्ये होणार मोठा घातक बदल; जगाला हादरवणारा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 03:09 PM2022-02-02T15:09:10+5:302022-02-02T15:16:49+5:30

या नव्या स्टडी रिपोर्टमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि मत्स्य व्यवसायावर गंभीर परिणाम होतील. खाद्यप्रेमींसाठी ही चिंताजनक बाब आहे.

मासे खाणाऱ्या खाद्यप्रेमींसाठी वाईट बातमी आहे. जे सी-फूड्स आवडीनं खातात तेदेखील चिंतेत येतील. कारण समुद्रातून सातत्याने ऑक्सिजन(Oxygen) कमी होत आहे. एका नव्या स्टडी रिपोर्टनुसार, २०८० पर्यंत जगभरातील सर्व समुद्रांमध्ये ७० टक्के ऑक्सिजनची कमतरता जाणवणार आहे.

हे संकट उभं राहण्याचं कारण म्हणजे मनुष्याकडून ज्या वेगाने प्रदुषण पसरवलं जात आहे. त्यामुळे जलवायू परिवर्तन होत आहे. क्लाइमेंट चेंज हे या संकटाचं मुख्य कारण आहे. नव्या रिपोर्टनुसार, समुद्राच्या मध्यभागी सर्वात जास्त मासे आढळतात. ज्यावर मत्स्य व्यवसाय चालतो. त्याठिकाणी सातत्याने ऑक्सिजनची कमतरता जाणवतेय. मागील २०२१ मध्ये जगातील समुद्रातील ऑक्सिजन गंभीर स्तरावर पोहचलं आहे.

समुद्रातील ऑक्सिजन गॅसरुपात मिश्रित झाली आहे. ज्याप्रकारे जमिनीवर प्राण्यांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन लागतो तसं समुद्रातील जीवांना ऑक्सिजनची गरज भासते. परंतु ज्याप्रकारे क्लाइमेंट चेंज होत आहे त्यामुळे समुद्र गरम होत आहे. पाण्यात मिश्रित ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत चाललं आहे. वैज्ञानिकांमध्ये याबाबत चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

नव्या स्टडीत सांगितलं आहे की, येणाऱ्या काळात समुद्रातील मिश्रित ऑक्सिजन कमी होत जात आहे. त्या प्रक्रियेला डिऑक्सिजेनेशन म्हणतात. हे केवळ खास समुद्रातच नव्हे तर जगातील समुद्रामध्ये याचा प्रभाव पडला आहे. केवळ काही समुद्रात त्याचे प्रमाण कमी-जास्त असू शकतं.

जर समुद्रात मिश्रित ऑक्सिजन कमी झालं तर ते पुन्हा बनवणं शक्य नाही. ही अशी प्रक्रिया आहे जी पुन्हा स्थापित करणं अशक्य आहे. समुद्रातील लेवल डिऑक्सिजेनेशन प्रक्रियेवर खूप परिणाम होत आहे. ही पातळी माशांना सुरक्षित ठेवू शकत नाही. २०२१ मध्ये याबाबतची रिपोर्ट अत्यंत भीषण होता.

स्टडीनुसार, २०८० पर्यंत डीऑक्सिजेनेशन(Deoxygenation) प्रक्रिया जगभरातील सर्व समुद्रात वेगाने वाढेल. समुद्राच्या मध्यभागीही ७० टक्के मिश्रित ऑक्सिजन कमी होईल. AGU जर्नलमध्ये जियोफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये हे प्रकाशित झालं. ज्यात क्लाइमेंट चेंजमुळे ऑक्सिजन स्तर कमी झाल्याचं पाहायला मिळालं.

समुद्रातील मध्यभागी २०० मीटर ते १००० मीटर खोलीला मेसोपिलैजिक झोन म्हणतात. त्यात अनेक झोन असतात. क्लाइमेंट चेंजमुळे पहिल्या झोनमधील ऑक्सिजन प्रमाण खूप जास्त कमी होत आहे. जागतिक स्तरावर मेसोपिलेजिक झोनमध्ये मत्स्य व्यवसायाशी निगडीत सर्व मासे मिळतात. ज्यावर जगाचा व्यापार सुरु आहे.

व्यावसायिक वापरासाठी असलेले मासे कमी झाले तर जगातील अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. सी फूडमध्ये कमतरता भासेल. समुद्री पर्यावरणावर त्याचा परिणाम होईल. सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे समुद्राचं पाणी गरम होतंय. गरम पाण्यात मिश्रित ऑक्सिजन प्रमाण कमी होत असते.

समुद्रातील मध्यभागी डीऑक्सिजेनेशन हे खूप चिंतेचे आहे. कारण याठिकाणी फोटोसिंथेसिस करण्यासाठी झाडं, शेवाळं आणि अन्य प्रजाती असतात. त्याठिकाणी सूर्याचा प्रकाश पोहचत नाही. परंतु त्याच पातळीवर काही असे घटक आहेत जे सर्वात जास्त ऑक्सिजन घेतात. ते खाण्याच्या नादात मासे त्याकडे आकर्षित होतात. ते संपले तर मासेही संपतील. त्याचाच परिणाम मत्स्य व्यवसायावर होईल

शांघाय जियाओ तोंग यूनिवर्सिटीचे यूंताओ झोऊ म्हणाले की, समुद्रात मध्यभागी असलेला झोन खूप महत्त्वाचा असतो. कारण व्यावसायिक दृष्ट्या त्याठिकाणी सर्वात जास्त मासे आढळतात. डीऑक्सिजेनेशनमुळे त्यावर परिणाम होईल. परंतु मासे काहींच्या दैंनदिन आयुष्याचा भाग आहे. जर ते कमी झाले तर जगातील आर्थिक आणि खाद्य व्यवसायत अनेक बदल घडतील.

त्याचसोबत मनुष्याने जमिनीवर सर्वात मोठी इकोसिस्टम बदलण्याची सुरुवात याआधीच केलीय. इकोसिस्टम मेटाबेलिक स्टेट खराब होत आहे. क्लाइमेंट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्रातील इकोसिस्टमवर खूप वाईट परिणाम होतील. परंतु समुद्राची अवस्था बिघडली तर त्याचा फटका लोकांनाही मोठा बसेल.

जर याच प्रकारे ऑक्सिजन कमी झाले तर मानवी ऑक्सिजन मिनिमम झोन्सवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. ते आसपासच्या परिसरातील प्रदूषण पातळी घटवण्यात मदत करतील. क्लाइमेंट चेंज थांबवतील. नाहीतर समुद्रात झालेल्या बदलाचे परिणाम मानवी आयुष्यावरही होतील.